Thursday, January 19, 2012

नाती (पुन्हा एकदा)

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीसाठी आपण जगात काहीही करू शकतो. मानाने आपल्या एकदम जवळचं असं कोणीतरी.
आणि बऱ्याचदा ती व्यक्ती मित्र / मैत्रीण असते. नात्यापेक्षा मैत्री जवळची होते.

मैत्री हेही एक नातच आहे म्हणा. आई, वडील, भाऊ, बहिण यांच्या सोबतीने उभा राहू शकेल इतक्या ताकतीच आहे.

नात म्हणजे खर तर दोन माणसांमधील समीकरण. प्रत्येकाच्या जन्माबरोबर बरीच समीकरणे तयार व्हायला सुरु होतात. जस जसे आपण मोठे होत जातो समीकरणे किचकट व्हायला लागतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण त्याच्या समीकरणात अधिक वजा करत जातो. आणि मग त्या समीकरणांचा वापर करून गणित सोडवतो.

आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहिण, मामा-भाचा, वाहिनी-दीर, मित्र.
काही नाती जन्मतःच तयार होतात तर बाकीची मैत्रीतून फुलत राहतात. कधी कट्ट्यावर, गल्लीत खेळताना, वर्गात शिकताना, ऑफिस मध्ये काम करताना किंवा असाच कुठेतरी सहजच फिरायला गेलेलो असताना.

माझ्यासाठी तरी नात हि संकल्पना एकदम सरळ सोप्पी आहे.
दोन जणांमधील थेट कनेक्शन. एखादा दोरा जणू. आणि जिथे दोरा आला तिथे गुंता होणारच. आपल्याला चैनच पडत नाही त्याशिवाय. :)
मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील वाक्य आहे, "नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात असते, पण आपण ती उलगडूच देत नाही."
खरच उगाचच धसमुसळे पण करून आपण गुंता करून ठेवतो. आणि मग गुंता वाढतच जातो. परिणामी शेवटी कुठेतरी एक दोरा तोडावा लागतो. कधी कधी तर पूर्ण दोरच फेकून द्यावा लागतो.

कोणत्याही नात्यामध्ये फार ताकद असते असं ऐकल होत. मग का भाऊ भावाला विचारात नाही, आई वडिलांना घरात जागा नाही, नवरा बायकोचं पटत नाही.
प्रत्येक गोष्टीत कामाला येणारा दोरा, गुंता झाला की मग आपलाच हात कापतो. तसच काहीसं होत.

नात्यात दुरावा येतो, म्हणून की काय आजच्या जगात विभक्त कुटुंब पद्धत रूढ होत चालली आहे. लांब राहिल्याने प्रेम टिकून राहत म्हणे.

नात्यात दुरावा एकत्र राहिल्याने येत नाही, त्याचा खर कारण आहे अविश्वास.
बर्याचदा असं होताना दिसत, कालपर्यंत जीवाला जीव लावणारे भाऊ अचानक एकमेकांच्या जीवावर उठतात. काळापर्यंत जीवश्च कंठश्च असणारे मित्र आयुष्यभर एकमेकांचा तोंड पाहत नाहीत.
आणि ते पण अचानक??

पडद्यामागच्या घडामोडी कायम पडद्यामागेच राहतात.
प्रत्येकाला वाटत असत, आपण वागतोय ते बरोबर आहे आणि सगळ्यांनी तसच वागाव. 'माझ्या मनात काही नसत रे, मी उगाच चेष्टा करत असतो.'
पण समोरच्याला हेच वागण चुकीच वाटत असत.
कोणाच मन मोडू नये म्हणून आपण सुरवातीला काही बोलत नाही. आणि नंतर हि सवय होऊन जाते. आणि नकळतच आपण कोणाचातरी मन दुखावून बसतो.
'एका छोट्याश्या काडीने उंटाची पाठ मोडावी' तसं नात मोडत.

एक मनमोकळा संवाद हि परिस्थिती रोखू शकतो, पण हा संवाद सुरु कोणी करायचा? स्वाभिमान नात्यासाठी बाजूला कोणी ठेवायचा? आणि जर ठेवलाच तर समोरचा त्याचा मान ठेवेल का?? अश्या एक ना अनेक प्रश्नांमध्ये आपण वेळ गमावून बसतो.
छोटीशी ठिणगी जर वेळीच नाही विझवली तर पूर्ण जंगल जळून जात, तसं आपण मन जाळून बसतो. मनावर झालेले घाव कोणीच विसरत नाही.
आपण नेहमी सुसंवाद ठेवला पाहिजे असं म्हणतात ते यासाठीच कदाचित.

"संसार हा रबर बेन्ड सारखा असतो, ताणला ना दोन्ही बाजूने तर तुटणारच. एकाने तरी सैल सोडायला हवा." (अगबाई अरेच्चा सिनेमातील)
कोणीतरी स्वाभिमान बाजूला ठेवून सुरुवात करायलाच हवी. अर्थात समोरच्यानेही तितकीच साथ दिली तर प्रश्न लवकर सुटतात.

संसाराप्रमाणेच प्रत्येक नात्यातही असाच काहीस वागाव लागत.

रेशमी धागाच तो. तलम, मऊ, सुंदर, मनाला भिडणारा आणि तितकाच नाजूक. जपायलाच हवा.
एक छानसं गाढ विश्वासच कवच घालून. कर्णाच्या कवच कुंडलासारख. मग कितीही मोठं वादळ येउदे, आतली सुंदरता तशीच राहते.

आपल्याकडच्या प्रत्येक रेशमी धाग्याला असं एक कवच असलं की मग आयुष्य सुंदर होत जात. जगण्यात मजा येते. बघा प्रयत्न करून.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

7 comments:

  1. Very nice and true statements...


    आपल्याकडच्या प्रत्येक रेशमी धाग्याला असं एक कवच असलं की मग आयुष्य सुंदर होत जात. जगण्यात मजा येते. बघा प्रयत्न करून...
    Shevatche vakya tar mastch...

    ReplyDelete
  2. फार सुंदर लिहिले आहेस रे ..

    माझ्यासाठी तरी नात हि संकल्पना एकदम सरळ सोप्पी आहे.
    दोन जणांमधील थेट कनेक्शन. एखादा दोरा जणू. आणि जिथे दोरा आला तिथे गुंता होणारच. आपल्याला चैनच पडत नाही त्याशिवाय. :)

    वपुर्झा मधला एखादा परिच्छेद वाचतोय असे वाटले ..
    खरेच सुंदर आहे ..

    ReplyDelete
  3. ....................नाती....................

    ठेवावी लागतात जपून नाती कशासाठी ते माहित नाही

    लपून बसतात कही भेटी ....................
    भेटले तर ओळखच नाही ....................
    अदृश्य होतात कही नाती ....................
    शोधून काढायची गरजच नाही ....................

    ....................होंत रहातात गाठी भेटी
    ....................ज्याची खरी गरजच नाही
    ....................काळजी करत फिरतो ज्यांची
    ....................त्यांच्या कड़े काळीजच नाही

    आठवत रहातात कही नाती ....................
    ज्याच्या कड़े आपुलकी नाही ....................
    वाईट वाटत ज्याच्या साठी ....................
    त्यांच्या डोळ्यात अश्रुच नाही ....................

    ....................मायतालाही येतात शेवटी
    ....................ज्यांच्या मनात दुःख च नाही
    ....................सोडून द्यावित अशी नाती
    ....................प्रेमाची जिथे झालर नाही

    ठेवावी लागतात जपून नाती कशासाठी ते माहित नाही

    मंदार.............................
    (हे नेहमी सत्य नसत पण .........)

    ReplyDelete