Thursday, June 23, 2011

(अ)नियम

"FIrst Break All The Rules"
(कोणी लिहिलंय ते माहित नाही, पण मस्त लिहिलंय)
जगभरात थोरामोठ्यांनी अनेक संदेश दिले आहेत. त्यात सगळ्यात जास्त पाळला जाणारा संदेश हाच असावा.

मेंदूला चालना मिळून आपण काहीतरी नवीन शोधाव म्हणून सांगितलेली शिकवण. काय असेल ते असो पण सगळेच जण मनापासून प्रामाणिकपणे पाळतात ही शिकवण.

दिसला नियम की तोड!!!

परीक्षेत पास झाल्यावर जसा आनंद होतो, तसा काहीस फिलिंग येत नियम तोडल्यावर.

याच सगळ्यात मस्त उदाहरण बघायचं असेल तर कोणत्याही इमारतीच्या जिन्यात जाव. बाकी संपूर्ण इमारतीचा रंग काहीही असो, पण जिन्याच्या कोपर्याचा रंग कायम लालच असतो.
"कृपया थुंकू नये" हे शब्द बिचारे कोपर्यात कुठेतरी अंग चोरून उभे असतात.

"चालत्या बस मध्ये चढू अगर उतरू नये." हा नियम लोक जीवाच्या भीतीने पाळतात पण मग त्यात मजा काय ना? म्हणूनच बसचालक बस नेहमी थांब्याच्या थोड्या पुढे किंवा कधी थोड्या मागेच उभी करतात. (कधी कधी तर हे थोडा अंतर वाढत वाढत बस डायरेक्ट पुढच्याच थांब्यावर.) अश्या वेळेस चालत्या सोडा धावत्या बसमध्ये चढाव लागत. :D

"नो पार्किंग" ही संकल्पना तर गम्मतच आहे. ही पाटी कायम गर्दीत वाट हरवल्यासारखी उभी असते. मग पाटीला वाईट वाटू नये म्हणून मग त्यातला 'नो' खोडून टाकायचा.

डाव्याबाजुने ओव्हरटेक करू नये; हा नियम तर बादच करायला हवा.
त्याऐवजी नवा नियम तयार करायचा, "कृपया जागा मिळाली तरच ओव्हरटेक करा, उगाच मध्ये मध्ये वाहन आणू नका"
(कारण आजकाल बाजू बघायला रस्त्यावर जागा आणि लोकांकडे वेळच नाहीये)

असो अशी यादी करत गेलो तर कदाचित भारताचं नाव (अ)संविधान तयार होईल.

सरळ सांगून कोणी ऐकत नाही, म्हणून नियम केले. तर नियम तोडण्यात सगळे पुढे. म्हणूनच कदाचित पुणेरी लोकांनी नवी शक्कल लढवली. "नो पार्किंग" च्या ऐवजी "इथे गाडी लावणारा मी गाढव आहे" असं लिहायला सुरुवात केली. (हेतू नक्कीच साध्य होत असावा. :D)

नियम आला की लगेच त्याच्या पळवाटा शोधायला सुरुवात होते. पण हे सगळ्यांना ज्याच्या त्याच्या सोयीने करायचं असत.

याच सगळ्यात सार्थ उदाहरण म्हणजे भ्रष्टाचार.
माझा एक मित्र एकदा सांगत होता, "भ्रष्टाचार करू नये. आपणच पुढाकार घेतला नाही तर हे कस बदलणार?" आणि असं बरंच काहीतरी तत्वज्ञान देत होता.
दुसर्या दिवशी त्याच्या पासपोर्ट साठी त्याला पोलीस व्हेरिफिकेशन साठी जायचं होतं. आदल्या दिवशीच मला तत्वज्ञान दिल्याने त्याने पैसे दिले नाही. मग काय हवालदार काकांनी पण कारणं द्यायला सुरुवात केली. आणि मग जास्त त्रास नको म्हणून त्याने गपचूप २०० रुपये दिले आणि काम पूर्ण करून घेतलं.

मी: का रे आता कुठ गेल तुझ तत्वज्ञान?
मित्र: अरे आत्ता जरा अर्जंट मध्ये पास्स्पोर्त हवा आहे. जायचं आहे पुढच्या महिन्यात बाहेर. पुढच्या वेळेस बघ पैसे ना देता काम करून घेईल.

प्रत्येकच थोड्याफार फरकाने असाच असत. स्वतः नियम तोडताना 'इमर्जन्सी आहे रे' आणि इतरांनी केला तर 'यामुळेच भारत पुढे जात नाही.'

मुळात नियम करावेच का लागतात?
"साक्षर लोकांना सुशिक्षित कारण हीच या देशाची खरी गरज आहे" (कायद्याच बोला चित्रपटातील वाक्य)
चांगल कसं वागायचं हे सगळ्यांनाच काळात. मग नियम का लागतात? कारण प्रत्येकजण परिस्थिती आपल्या सोयीने बघतो.

नो पार्किंग चा नो खोडण्यात मेहनत घेण्यापेक्षा गाडी योग्य जागेत लावण्याची मेहनत घ्यावी.
"पण मग त्याने का नाही गाडी जागेवर लावली? आधी त्याला सांगा." ही मानसिकता कायम आड येते.

ही विचारसरणी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सगळे नियम व्यर्थ. आणि बदलल्यानंतर कदाचित नियमांची गरजच उरणार नाही...

3 comments:

  1. छान .... यापुढे जर कधी कुठे लाच द्यायची वेळ आली की नक्की ह्या गोष्टीची आठवण येयील :)

    ReplyDelete