आज fwd मेल मध्ये २६-११ चा मेल आला.
"Which victory was important?" त्यात वर भारतीय क्रिकेट टीम एका २०-२० चा विश्वचषक जिंकून आली होती तेव्हाचा त्यांचा सत्कार, त्यांचे स्वागत असे काही फोटो होते. आणि खाली २६-११ ची लढाई संपल्यानंतर चे आपले जवान, त्यांचे काही फोटो होते. त्या फोटोत ते एका सध्या बेस्ट बस मध्ये बसलेले होते.
या बातमीने तेव्हापुरते छोटेसे वादळ उठवले आणि ते तितक्याच लवकर शांत पण झाले.
त्या घटनेनंतर जेव्हा परत 'ताज हॉटेल' आणि 'गेट वे ऑफ इंडिया' लोकांसाठी परत सुरु करण्यात आले त्यावेळी फार लोकांनी तिथे उस्फुर्तपणे हजेरी लावली. सगळ सगळ स्पष्टपणे आठवत होत.
"खरच कोणता विजय आवश्यक होता?" २०-२० चा कि २६-११ चा? एखादा लहान मुलगाही सांगेल कि २६-११ महत्वाच होत.
ग्राउंड वर खेळाडूंनी मारलेल्या निष्फळ उड्यापेक्षा जवानांनी गोळ्यांच्या वर्षावात मारलेल्या उड्या खरच महत्वाच्या होत्या. bat ने मारलेल्या ४-६ पेक्षा जवानांनी बंदुकीने आतंकवाद्याना मारणं निश्चितच जास्त महत्वाच होत.
त्या लढाईत जवानांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना मिळालेली ती वागणूक खरच चुकीची होती. सरकारला मंत्र्यांसाठी लागेल तेव्हा लागेल ते साधन उपलब्ध करून देता येत. मग या सगळ्या जवानांसाठी एक चांगली बस का येऊ नये? एखादा खेळाडू काही जिंकून आला तर त्याचा जाहीर सत्कार होतो, मग कायम स्वतःच्या आयुष्यावर खेळणाऱ्या या खेळाडूंसाठी काहीच का नाही?
कोणत्याही किंमत नसलेल्या मुद्द्यावरून भांडणारे राजकीय पक्ष, त्यांनी यासाठी काय केल? कोणी स्वतः पुढे येऊन केली यांची सोय? कोणी दिली स्वतः ची गाडी या जवानांसाठी? कोणी मनापासून शहीद झालेल्यांना दिली श्रद्धांजली? नाही, उलट त्यांचीच जाहिरात करून पूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पक्षाची नाव झळकली.
एक prince विहिरीत पडला तर त्याचा आख्खं आयुष्याचा खर्च उचलायला तयार झालेले channel वाले आता कुठे गेले? कोणी केलं एखाद्या शहीद पोलिसाच्या घराला sponsar?
सगळ्यांचाच "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात".
मला खरच या गोष्टीच फार वाईट वाटलं. पण त्यापेक्षा जास्त खेदाची बाब होती की "मी यासाठी काहीच केल नाही."
कोणीतरी एक मेल तयार केला आणि तो मेल आला कि Forward चा बटन दाबल. यापेक्षा जास्त काय झालं?
हळहळ व्यक्त केली, मित्रांसोबत या विषयावर नुसतीच चर्चा केली आणि संपल. जितका दोष सरकारचा तितकाच किंबहुना जास्तच दोष सामान्य जनतेचा. आणि त्यात मीही आलोच.
एक सामान्य माणूस काय करू शकला असता???
मला फोटोत बेस्ट बस च्या दारात बसलेल्या जवानाचा चेहरा आठवतो. एक समाधान होत त्या चेहऱ्यावर. काही वाईट लोकांना थांबवल्याच. काही निष्पाप प्राण वाचवल्याच.
आणि त्यासाठी त्या जवानांना किती जणांनी धन्यवाद दिले? काही निवडक लोकांनी, वार्ताहरांनी, आणि स्वहितासाठी जाहिरात करणाऱ्या राजकीय पक्षांनी. क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी हजार असलेल्या लोकासंख्याच्या १% लोकही जवानांना धन्यवाद म्हणण्यासाठी हजर नव्हते. अभिनेत्यांच्या गळ्यात पडण्यासाठी आसुसलेले, क्रिकेट खेळाडूंच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्या मागे फिरणारे, त्यासाठी पोलिसांशी मारामारी करणारे लाखोंच्या संख्येने आहेत.
ती सगळी सामान्य माणसच आहेत ना? मग त्यापैकी किती सामान्य माणस इथे एक साधा धन्यवाद करायला आली?
रस्ता रोको करायला तयार असणारी किती लोक रस्त्यावर उतरली? उपोषणाला बसणाऱ्या नेत्यांना का नाही वाटल कि सरकारला यासाठी वेठीस धराव? गेट वे ऑफ इंडिया ला भरपूर जणांनी मेणबत्या लावून शहीदांना आदरांजली दिली. त्यापैकी कितीजण तसेच तडक मंत्रालयावर गेले, कितींनी सरकारला यासाठी कोंडीत पकडलं?
news channel वर फालतू गप्पा मारून "आम्ही जनतेसाठी सगळ करतोय", "आम्हीही सामान्य माणूसच आहोत", "सरकारला याच उत्तर द्यावच लागेल" अश्या गर्जना कायम करणारे किती लोक पुढे आले?
कोणीच नाही.
एक सामान्य माणूस आपल्या आवडत्या star ला भेटण्यासाठी सगळे नियम तोडून जाऊ शकतो, पण तोच सामान्य माणूस कोणताही नियम न तोडता जवानांना भेटायला नाही जाऊ शकत. त्याला एक प्रेमाने मिठी मारून, "आज तू आमच रक्षण केलस" हे नाही म्हणू शकत.त्याला राखी बांधण्यासाठी एखादी बहिण पुढे नाही येऊ शकत. भावासाठी १० लोकांशी भांडणारा मोठा भाऊ पुढे नाही येऊ शकत.
का? कारण हे सामान्य माणसाच्या व्याख्येत बसत नाही.
स्वतःचा जीव सांभाळून दुरून सल्ले देणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'शिवाजी जन्मावा पण शेजारच्याच्या घरात' हे म्हणणारी व्यक्ती सामान्य माणूस. पोकळ गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'मी सामान्य माणूस आहे. मी काय करू शकतो?' असा म्हणून रडत बसणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस.
आणि म्हणूनच सरकारच्या अश्या चुकांसाठी कोणीच काही केलं नाही. कोणी स्वताहून मदत केली नाही.
केल तर फक्त एकाच, आलेल्या मेल ला FWD.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखात कोणावरही व्यक्तिगत आरोप करण्याचा हेतू नाही. काही लोकांनी खरच अश्या वेळेस पुढे होऊन मदत केली. जे करणं आवश्यक होत ते सगळ कशाचीही परवा ना करता केल. त्या सगळ्यांना मनापासून सलाम. त्या सगळ्यांच्या सोबतीने मी काहीच नाही केलं या खेदातून लिहिलेला हा लेख. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही, पण तसे काही झाले असल्यास क्षमस्व.
...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

chhan lihlay ,,,
ReplyDeleteकलाकार्रांसाठी वा खेळाडूंसाठी केलेली प्रत्येक गोष्ट जागा समोर आणली जाते .... ते वाचणारे वा पाहणारे भरपूर जन असतात .... पण जवानांना वा सा्मान्य कार्यकर्त्यांसाठी केलेलं जागा समोर आणल नाही जात ..... त्याच्यासाठी तुझा हा प्रयत्न आवडला :)
ReplyDelete