"लग्न" प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक.
batchlor 's लाईफ मधून एका दिवसात responsible लाईफ मध्ये परिवर्तन.
मुलगा (२५) आणि मुलगी (२२) ची झाली की सगळीकडे स्थळ बघायला सुरुवात.
कसरत इथूनच सुरु होते. कितीतरी गोष्टी बघितल्या जाता.
मुलगी शिकलेली पाहिजे (बाबा), घर सांभाळणारी पाहिजे (आई), नोकरी करणारी हवी (ताई), घरात राहणारी हवी, मोठ्यांना सांभाळणारी हवी (आजी-आजोबा)
आणि अशी बरीच यादी असते. घरातल्या ईतर लोकांची पण एक अशीच यादी तयार असते.
स्वयंपाक येणारी हवी, आम्हाला मान देणारी हवी (चुलत बहिणी), सुंदर मुलगी बघा हा भावोजी (वाहिनी) आणि असं अजून बरंच काही.
मुलगा बघताना parameter बदलतात.
मुलगा शिकलेला पाहिजे, चांगली नोकरी हवी, (व्यवसाय असेल तर मुलगा वेटिंग लिस्ट वर.) शक्यतो भाऊ बहिण नसावे (म्हणजे भविष्यात होऊ शकणारे तंटे टळतात) मुलगा शहरात राहणारा आणि आई वादिन गावाकडे असतील तर उत्तमच.(सासू सासऱ्यांचा त्रास कमी) आणि अजून बरंच काही.
या सगळ्या गोंधळात मुला मुलीला कसं सोबती हवा हेच राहून जात. आजकालच्या बदलेल्या स्थितीत मुला मुलीला बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ दिला जातो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या हिशोबाने ते बघतात.
जे प्रेम विवाह करतात तिथे बाकीच्यांना कल्टी मिळते. मुलगा मुलगी फक्त महत्वाचे. पण या फायद्यासाठी त्यांना भरपूर संघर्ष पण करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफिस मध्ये एक सेशन झालं. नुकताच लग्न झालेले, ज्यांची process चालूल आहे अश्यांसाठी.
त्यात विचारलं आपण लग्न का करतो? वेगवेगळी कारण बाहेर आली:
१. प्रेमासाठी
२. सोबतीसाठी
३. समाज म्हणतो म्हणून
४. आई वडील म्हणतात म्हणून
५. responsible व्यक्ती स्टेटस मिळावा म्हणून.
६. करायचं म्हणून करायचं.
प्रत्येकाची कारण वेगळी असतात. तसेच प्रत्येकाची आपला सोबती कसा असावा याच्या संकल्पना ही वेगळ्या असतात.
सुंदर असावी, स्वयंपाक येत असावा, नोकरी करणारी असावी, सगळ्या गोष्टी एन्जोय करणारी असावी.
किंवा handsome असावा, चांगला पगार असावा, माझ्यासोबत shopping करायला यायला तयार असावा, ईत्यादी.
या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे आपला सोबती समजूतदार असावा. एखाद्या गोष्टीत समजूतदार पण ना दाखवल्यास छोटीशी गोष्टही कुठल्या कुठे जाते.
घटस्फोट, लग्नानंतर घडू शकणारी सगळ्यात वाईट गोष्ट. निम्म्याहून जास्त लग्न समजूतदार पणा नसल्याने मोडतात.
समजदार नाही म्हणजे व्यक्ती वेडी आहे असं नाही. आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याव हे कळाल नाही की झालं.
ऑफिस सेशन मध्ये एक केस सांगितली.
एका मुलीला दम्याचा त्रास होता. पण बाकी सगळ्या गोष्टी फार चांगल्या होत्या म्हणून मुलगा तयार होता लग्नाला.
पण लग्नानंतर एकाच महिन्यात भांडण सुरु झालं. दम्यामुळे तिला आजूबाजूला कोणी स्केंत किंवा देओ मारलेला चालत नसे. आणि त्याला ही गोष्ट पटत नव्हती. त्याला वेगवेगळे देओ वापरायचा छंद होता.
अश्या वेळेस प्राधान्य कोणाला द्यायचं?
दमा, आपला सोबती, की आपला छंद?
सगळ्यांनाच आपला सोबती राजकुमार किंवा राजकुमारी असावी असं वाटत. या जगात कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे राजकुमार मिळण पण शक्य नाही.
आणि एखादी राजकुमारी मिळालीच तर आपण स्वतः राजकुमार आहोत का हे पण बघायला हव.
तडजोड कुठे ना कुठे तरी करावीच लागणार. मग ती करून संसार हसत खेळत ठेवायचा की आपल्या जोडीदाराकडून शक्य नसलेल्या अपेक्षा करून त्रागा..
पाण्याने अर्ध्या भरलेल्या पेल्यासारख आहे. जे बघू तेच दिसेल.
नजर आपलीच, विचार आपलाच, समजूतदारपणा आपलाच आणि पर्यायाने सुखी संसारही आपलाच.
(ता. क.: माझही लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे सुचलेला हा विषय आणि ठरवलेल्या काही गोष्टी. :D परीक्षा लवकरच आहे. :D)
...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...
uttam ahe ha lekh nehmipramane... hyatlya baryachshya goshtincha anubhaw ghetla ahe me...
ReplyDeletemast mast mast....
धन्यवाद.
Deleteखूप छान वाटलं हा लेख वाचून . लग्नानंतर मला समजलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एकमेकांच्या बद्दल आदर हवा.. आपल्या जोडीदाराचे काम , त्याच्या आवडीनिवडी इत्यादी गोष्टींबद्दल आदर असावा..विशेषतः जेव्हा दोघे नोकरी करणारे असतील.आपापल्या करिअर मध्ये बिझी असतील तेव्हा.. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट निरपेक्ष प्रेम आणि विश्वास...
ReplyDelete100% सहमत.
Deletechhan
ReplyDeletegood one .... n my best wishes :)
ReplyDeleteNow give your after marriage thoughts .. :)
ReplyDeleteNow give your after marriage thoughts .. :)
ReplyDelete