Tuesday, June 7, 2011

परीक्षा

ऑफिस मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होती.सगळी तयारी झालीये पण काहीतरी एक राहिलंय असे काहीसे चेहऱ्यावरील भाव. किंचित टेन्शन.
त्यात मी कडक आवाजात सूचना देऊन वातावरण अजून थोडसं गंभीर केल.

Start म्हटल्याबरोबर सगळेजण पेपर सोडवण्यात दंग. त्यांना बघून मला माझे कॉलेजमधले दिवस आठवले. पूर्ण semester अभ्यास केलेला नसायचा. आणि मग परीक्षा आली की सॉलिड वाट लागायची.
त्या एका वर्गात कितीतरी भाव एकत्र आलेले असतात.
ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असतात तो तर राजधानी एक्सप्रेस प्रमाणे सुटलेला असतो. ज्याला काही  येत नसत तो आपला पासेंजर प्रमाणे सगळी कडे थांबत थांबत उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
कोणी नख खातात, कोणी डोक खाजवतात, कोणी सारखे घड्याळाकडे बघत असतात तर कोणी पेपर सेट करणार्याला नाव ठेवत बोट मोडत असतात.
कोणाची पेपरवर  गणित मांडलेली असतात तर कोणाची हवेतच आकडेमोड चालू असते.
सगळी उत्तर येणाऱ्याची चिंता वेगळीच असते. "साला सगळी उत्तर इतकी सहज येतायेत, काही चुकत तर नाहीये ना??" (मला असं बऱ्याचदा होतं. :D)

आपल्याला उत्तर येत नसल की आपण मग आपल्यासारखा अजून कोण आहे का ते शोधत असतो. कोणी तरी सापडतच. मग जरा समाधान मिळत. तितक्यात आवाज येतो,
"सर, सप्लीमेंट."
झाल. आपल उरल सुरलं अवसान पण गळून पडत. मग सगळी हुशार मुल सप्लीमेंट मागायला सुरुवात करतात. (कधी कधी मोकळीच. उगाच भाव खाऊन जायचं म्हणून.)

परीक्षेत आपल्याला मागच्या महिनाभरात घोकालेल सगळच उतरवायचं असत. पेपर च्या अर्धा तास आधी वाचलेलं सगळ्यात आधी बाहेर काढव लागत. कारण ते पुसलं जाण्याची शक्यात फार जास्त. पेपर च्या आधी, "अरे काय टेन्शन घेतो यार? सोप्पा विषय आहे हा एकदम"  म्हणणारे पण घाम पुसताना दिसतात.

जुन्या काळी परीक्षा म्हटली की पाठीत गोळे यायचे. कारण जर मार्क कमी पडले तर शाळेत गुरुजी मारणार आणि घरी आल्यावर गुरुजींनी तुला टोले दिले म्हणजे तुझच चुकल असणार असं म्हणून वडील फैलावर घेणार.

पण आता परीक्षा म्हटली की पोटात गोळे येतात. (मुलांच्या नाही, त्यांच्या पालकांच्या. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो ना)
युद्धावर निघालेल्या राजासारखी पालकांची तयारी चालू असते मुलांच्या परीक्षेसाठी.

बर परीक्षा झाली की आराम नाही. कारण लगेचच निकाल  लागणार असतो. आणि त्यावरच रोजच्या खेळण्याचा वेळ अवलंबून असतो. (inverse proportion मध्ये)

"सर, टेस्ट चा रिझल्ट कधी येणार?" "इन्टरव्हीव्यू लगेच होणार का?" असे एकामागून एक प्रश्न मुलांनी मला विचारायला सुरुवात केली. सगळ्यांना जेवून यायला सांगून मी पेपर चेक केले. आणि इन्टरव्हीव्यू चा शेड्युल तयार केल.
रिझल्ट ची घाई करणारे हेच मुलं इन्टरव्हीव्यू शेड्युल बघून एकदम फुस्स झाले. "सर, मला पहिले नाही जायचं. दुसर कोणीच नाही का? त्याला पाठवा, तो हुशार आहे."
"सर किती जण असतात इन्टरव्हीव्यू घ्यायला? कसे प्रश्न विचारतात?"
मला वाटायला लागल जसा काय माझाच इन्टरव्हीव्यू चालू होता.

तिकडे रूम मध्ये इन्टरव्हीव्यू सुरु, आणि बाहेर सगळ्यांच्या फेऱ्या सुरु. भयंकर बेचैनी. आणि घड्याळाचा काटा एकदा २० मिनिटांच्या वर गेला की सगळ्यांचे चेहरे हवा गेलेल्या चेंडूसारखे होतात.
सिंहाच्या गुहेतून मुलगा बाहेर आला की लगेच सगळे त्याच्यावर परत तुटून पडतात. "काय विचारलं? प्रोजेक्ट चा काय सांगितलं? अवघड प्रश्न विचारतात का?"
इन्टरव्हीव्यू चांगला गेलेला मुलगा एकदम वाघ मारून आल्यासारखा असतो नाहीतर वाघ मागे लागलेल्या शिकाऱ्यासारखे भाव दिसतात.

सगळ झाल की मग पुन्हा, "सर फायनल रिझल्ट कधी?"

परीक्षेच्या आधी आणि रिझल्ट च्या आधी नक्कीच देवाचा inbox कायम फुल राहत असणार. कोणाला रिझल्ट चांगला हवा असतो तर कोणाला तो पुढे ढकलला जावा असं वाटत असत.

शेवटी मुलं ती मुलच, परीक्षा त्या परीक्षाच, इन्टरव्हीव्यू ते इन्टरव्हीव्यूच राहणार. या सगळ्यांचा स्वरूप कायम बदलत राहणार. पण एक नक्की पोटात होणारी गडबड कायम तशीच राहणार. :)

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

2 comments:

  1. पोटात होणारी गडबड तशीच राहणार !!!!!!!!!

    छान लिहले आहेस

    ReplyDelete
  2. real fact ahe. mast lihila ahes.

    asach lihit raha.

    ReplyDelete