Tuesday, January 31, 2012

"मंगल परिणय"



"लग्न" प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक.
batchlor 's लाईफ मधून एका दिवसात responsible लाईफ मध्ये परिवर्तन.

मुलगा (२५) आणि मुलगी (२२) ची झाली की सगळीकडे स्थळ बघायला सुरुवात.

कसरत इथूनच सुरु होते. कितीतरी गोष्टी बघितल्या जाता.
मुलगी शिकलेली पाहिजे (बाबा), घर सांभाळणारी पाहिजे (आई), नोकरी करणारी हवी (ताई), घरात राहणारी हवी, मोठ्यांना सांभाळणारी हवी (आजी-आजोबा)
आणि अशी बरीच यादी असते. घरातल्या ईतर लोकांची पण एक अशीच यादी तयार असते.
स्वयंपाक येणारी हवी, आम्हाला मान देणारी हवी (चुलत बहिणी), सुंदर मुलगी बघा हा भावोजी (वाहिनी) आणि असं अजून बरंच काही.

मुलगा बघताना parameter बदलतात.
मुलगा शिकलेला पाहिजे, चांगली नोकरी हवी, (व्यवसाय असेल तर मुलगा वेटिंग लिस्ट वर.) शक्यतो भाऊ बहिण नसावे (म्हणजे भविष्यात होऊ शकणारे तंटे टळतात) मुलगा शहरात राहणारा आणि आई वादिन गावाकडे असतील तर उत्तमच.(सासू सासऱ्यांचा त्रास कमी) आणि अजून बरंच काही.

या सगळ्या गोंधळात मुला मुलीला कसं सोबती हवा हेच राहून जात. आजकालच्या बदलेल्या स्थितीत मुला मुलीला बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ दिला जातो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या हिशोबाने ते बघतात.
जे प्रेम विवाह करतात तिथे बाकीच्यांना कल्टी मिळते. मुलगा मुलगी फक्त महत्वाचे. पण या फायद्यासाठी त्यांना भरपूर संघर्ष पण करावा लागतो.

काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफिस मध्ये एक सेशन झालं. नुकताच लग्न झालेले, ज्यांची process चालूल आहे अश्यांसाठी.
त्यात विचारलं आपण लग्न का करतो? वेगवेगळी कारण बाहेर आली:
१. प्रेमासाठी
२. सोबतीसाठी
३. समाज म्हणतो म्हणून
४. आई वडील म्हणतात म्हणून
५. responsible व्यक्ती स्टेटस मिळावा म्हणून.
६. करायचं म्हणून करायचं.

प्रत्येकाची कारण वेगळी असतात. तसेच प्रत्येकाची आपला सोबती कसा असावा याच्या संकल्पना ही वेगळ्या असतात.
सुंदर असावी, स्वयंपाक येत असावा, नोकरी करणारी असावी, सगळ्या गोष्टी एन्जोय करणारी असावी.
किंवा handsome असावा, चांगला पगार असावा, माझ्यासोबत shopping करायला यायला तयार असावा, ईत्यादी.

या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे आपला सोबती समजूतदार असावा. एखाद्या गोष्टीत समजूतदार पण ना दाखवल्यास छोटीशी गोष्टही कुठल्या कुठे जाते.

घटस्फोट, लग्नानंतर घडू शकणारी सगळ्यात वाईट गोष्ट. निम्म्याहून जास्त लग्न समजूतदार पणा नसल्याने मोडतात.
समजदार नाही म्हणजे व्यक्ती वेडी आहे असं नाही. आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याव हे कळाल नाही की झालं.

ऑफिस सेशन मध्ये एक केस सांगितली.
एका मुलीला दम्याचा त्रास होता. पण बाकी सगळ्या गोष्टी फार चांगल्या होत्या म्हणून मुलगा तयार होता लग्नाला.
पण लग्नानंतर एकाच महिन्यात भांडण सुरु झालं. दम्यामुळे तिला आजूबाजूला कोणी स्केंत किंवा देओ मारलेला चालत नसे. आणि त्याला ही गोष्ट पटत नव्हती. त्याला वेगवेगळे देओ वापरायचा छंद होता.

अश्या वेळेस प्राधान्य कोणाला द्यायचं?
दमा, आपला सोबती, की आपला छंद?

सगळ्यांनाच आपला सोबती राजकुमार किंवा राजकुमारी असावी असं वाटत. या जगात कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे राजकुमार मिळण पण शक्य नाही.
आणि एखादी राजकुमारी मिळालीच तर आपण स्वतः राजकुमार आहोत का हे पण बघायला हव.

तडजोड कुठे ना कुठे तरी करावीच लागणार. मग ती करून संसार हसत खेळत ठेवायचा की आपल्या जोडीदाराकडून शक्य नसलेल्या अपेक्षा करून त्रागा..
पाण्याने अर्ध्या भरलेल्या पेल्यासारख आहे. जे बघू तेच दिसेल.

नजर आपलीच, विचार आपलाच, समजूतदारपणा आपलाच आणि पर्यायाने सुखी संसारही आपलाच.

(ता. क.: माझही लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे सुचलेला हा विषय आणि ठरवलेल्या काही गोष्टी. :D परीक्षा लवकरच आहे. :D) 

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Friday, January 20, 2012

देवाचं ऑफिस



आपल्याकडे ऑफिस मध्ये प्रत्येक गोष्ट कागदावर लिखित स्वरूपात हवी असते. कारण उद्या कोणी काही चौकशी काढली, कोणी काही चूक केली तर लगेच आपण कागदोपत्री दाखले देऊन आपल्या डोक्यावरून दोष झटकून मोकळे. 

आणि अश्याच गरजेच्या वेळी जर तो कागदच गहाळ झाला तर??
आपलं नशीब तर असं असत, की कामं नसेपर्यंत आपण सगळ सांभाळून ठेवतो. आणि ज्या दिवशी आपण कागद / मेल फेकून देतो नेमकी दुसर्या दिवशीच त्याची गरज पडते.
आकाश पातळ एक करून आपण ते शोधायच्या मागे. आणि इतक करूनही नाही सापडला कागद की मग देवाचा धावा..

देवाची सगळी कामं जशी परफेक्ट असतात तशी आपली का होत नाहीत?

गेली कित्येक वर्षे देव संपूर्ण ब्रम्हांड अगदी व्यवस्थितपणे चालवतोय. एकही चूक नाही.
देवाचं एक बर आहे, सगळ ब्रम्हांड त्याचंच. कोणाला उत्तर द्यायचं नाही, कोणाच ऐकून घ्यायचं नाही.

पण देवाला कोणाला उत्तर द्यायचं असेल तर? त्यालाही कोणीतरी वरून order देत असेल तर? त्यालाही वर्षाअखेरीस balance sheet मध्ये नफा दाखवावा लागत असेल तर?

सगळ्या देवांचे सदा हसमुख भाव एकदम बदलतील.

देव त्याच्या क्युबिकल मध्ये. (अर्थात क्युबिकल पण मोठं असणार म्हणा) समोर भला मोठं १००" स्क्रीन. त्यावर १५००-१६०० application एकत्र चालू. आणि देव कोणत्यातरी  फाईल  मध्ये डेटा अपडेट करतोय.
पूर्ण जगातले इतके लोक, प्रत्येकाचा पाप पुण्याचा प्रत्येक मिनिटाचा हिशोब. सगळा डेटा नुसता बघूनच चक्कर यायची.
मग इतक्या मोठ्या गबाळात कुठेतरी गडबड ती व्हायचीच. एखाद वेळेस कॉम्पुटर hang होणार. मग त्याचा खाली काय असार होणार?

या सगळ्यात एखाद्या फाईल मधला डेटा चुकून डिलीट झाला की खाली त्या व्यक्तीची लगेच "याददाश्त गायब"
"मै कहा हु? मै कौन हु?" मोड मध्ये जाणार.
एखाद्या फाईल च्या प्रोग्राम मध्ये शेवटी end कमांड लिहिली आणि फाईल बंद करायची राहिली की खाली माणूस कोमा मध्ये.
वरती area manager ची टारगेट ची मीटिंग आली की लगेच खाली सुनामी, चक्री वादळ, भूकंप..
देवाने वर रेफ्रेश केल की खाली लगेच दिवस चेंज.

असं म्हणतात की ब्रम्हदेव निर्मिती करतात, विष्णू संगोपन आणि शंकर संपवतात.
दर महिन्याला विष्णुदेव शंकर देवाकडे डेटा पाठवणार.

"या महिन्यात वेळ संपलेल्यांची यादी"
शंकर देव लगेच फाईल  यमाकडे पाठवणार. तितक्यात विष्णुदेवाच्या लक्षात येणार अरे एक नाव चुकून लिहील गेलं. लगेच मेल फोन जाणार.
आणि खाली पृथ्वीवर एखादी व्यक्ती एखाद्या १०० च्या माळ्यावरून पडताना मधेच कुठेतरी अलगद अडकणार.
वर देव बिचारा आपला घाम पुसत असणार आणि आपण खाली चमत्कार म्हणून टाळ्या वाजवणार. :)

रोज रोज असा काहीतरी गोंधळ, कुठे चमत्कार, कुठे नमस्कार, या सगळ्यात कॉम्पुटर hang.
मग alt + ctrl + delete : आणि खाली कलयुग संपून दुसर युग सुरु होणार.

पण कामाच्या वेळेस देव त्याच खर काम करणार. खर्या भक्तांच्या अडचणी सोडवणार. त्यांची मदत करणार. न सांगता, न मागता.
तो अडकलेला असतो त्याच्या जवळच्या लोकांच्या  प्रश्नात. तो विचारात असतो सगळ्यांच भलं करण्यात.

आजकाल देवाच्या ऑफिस (मंदिर) पुढे भेटायला येणार्यांची गर्दी वाढतच चालली आहे. सुट्टी असेल तर मुंगीसुद्धा घाबरून आत नाही जाणार इतकी गर्दी.
लोकांमधली भक्ती वाढली की पाप धुण्याची गरज??

बहुतेक पाप धुण्याची गरज.

'प्रत्येक माणसात देव आहे' ही संकल्पनाच नाहीशी झालीये. माणुसकी दिसेनाशी झालीये.
देवाला लाख रुपये देणगी म्हणून देणारे आपण रस्त्यावरच्या गरिबाला २ रुपये पण देत नाही.
मॉल मध्ये जाऊन ७०० रुपयांची गोष्ट १००० ला घेणारे आपण ५ रुपयाच्या भाजीत 1 रुपयासाठी घासाघीस करणार.
देवाची मूर्ती १ मिनिट जास्त दिसावी म्हणून दुसर्या माणसाला धक्काबुक्की करून जाणार.

मग कसे काय आपण पुण्य कमावणार? म्हणूनच देवस्थळी गर्दी. पुण्य तर मिळत नाहीये, कमीत कमी पापाचा भरलेला घडा तरी वेळोवेळी रिकामा करून यावं, म्हणजे नव्याने पाप करायला परत मुभा. मला तर वाटत देवाने पाप पुण्याचे घडेही बदलले असतील.
पुण्यासाठी छोटा तांब्या आणि पापासाठी मोठा रांजण...

देवही बसल्या बसल्या विचार करत असेल, इतके लोक, त्यांचा इतका पाप पुण्याचा हिशोब, मागचा जन्म, पुढचा जन्म आणि अजून काय काय...
माझा तर ठाम विश्वास आहे,देव ज्याचा त्याचा हिशोब ज्या त्या जन्मताच पूर्ण करत असेल. सगळ करून बाकी नेहमी शून्य.

मग आपण त्यावर तोडगा म्हणून या देवाचा अभिषेक कर, त्या देवाचा हवन कर, इकडे देणगी दे, त्या ग्रहाची शांती कर आणि अजून बरंच काही.

मग या सगळ्याला वैतागून देव शेवटी एकच करणार.
alt + ctrl + delete
alt आणि ctrl तर बहुतेक देवाने दाबल आहे. फक्त delete बाकी आहे. बघूया आपण देवाला कधी भाग पाडतो ते.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, January 19, 2012

नाती (पुन्हा एकदा)

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीसाठी आपण जगात काहीही करू शकतो. मानाने आपल्या एकदम जवळचं असं कोणीतरी.
आणि बऱ्याचदा ती व्यक्ती मित्र / मैत्रीण असते. नात्यापेक्षा मैत्री जवळची होते.

मैत्री हेही एक नातच आहे म्हणा. आई, वडील, भाऊ, बहिण यांच्या सोबतीने उभा राहू शकेल इतक्या ताकतीच आहे.

नात म्हणजे खर तर दोन माणसांमधील समीकरण. प्रत्येकाच्या जन्माबरोबर बरीच समीकरणे तयार व्हायला सुरु होतात. जस जसे आपण मोठे होत जातो समीकरणे किचकट व्हायला लागतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण त्याच्या समीकरणात अधिक वजा करत जातो. आणि मग त्या समीकरणांचा वापर करून गणित सोडवतो.

आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहिण, मामा-भाचा, वाहिनी-दीर, मित्र.
काही नाती जन्मतःच तयार होतात तर बाकीची मैत्रीतून फुलत राहतात. कधी कट्ट्यावर, गल्लीत खेळताना, वर्गात शिकताना, ऑफिस मध्ये काम करताना किंवा असाच कुठेतरी सहजच फिरायला गेलेलो असताना.

माझ्यासाठी तरी नात हि संकल्पना एकदम सरळ सोप्पी आहे.
दोन जणांमधील थेट कनेक्शन. एखादा दोरा जणू. आणि जिथे दोरा आला तिथे गुंता होणारच. आपल्याला चैनच पडत नाही त्याशिवाय. :)
मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील वाक्य आहे, "नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात असते, पण आपण ती उलगडूच देत नाही."
खरच उगाचच धसमुसळे पण करून आपण गुंता करून ठेवतो. आणि मग गुंता वाढतच जातो. परिणामी शेवटी कुठेतरी एक दोरा तोडावा लागतो. कधी कधी तर पूर्ण दोरच फेकून द्यावा लागतो.

कोणत्याही नात्यामध्ये फार ताकद असते असं ऐकल होत. मग का भाऊ भावाला विचारात नाही, आई वडिलांना घरात जागा नाही, नवरा बायकोचं पटत नाही.
प्रत्येक गोष्टीत कामाला येणारा दोरा, गुंता झाला की मग आपलाच हात कापतो. तसच काहीसं होत.

नात्यात दुरावा येतो, म्हणून की काय आजच्या जगात विभक्त कुटुंब पद्धत रूढ होत चालली आहे. लांब राहिल्याने प्रेम टिकून राहत म्हणे.

नात्यात दुरावा एकत्र राहिल्याने येत नाही, त्याचा खर कारण आहे अविश्वास.
बर्याचदा असं होताना दिसत, कालपर्यंत जीवाला जीव लावणारे भाऊ अचानक एकमेकांच्या जीवावर उठतात. काळापर्यंत जीवश्च कंठश्च असणारे मित्र आयुष्यभर एकमेकांचा तोंड पाहत नाहीत.
आणि ते पण अचानक??

पडद्यामागच्या घडामोडी कायम पडद्यामागेच राहतात.
प्रत्येकाला वाटत असत, आपण वागतोय ते बरोबर आहे आणि सगळ्यांनी तसच वागाव. 'माझ्या मनात काही नसत रे, मी उगाच चेष्टा करत असतो.'
पण समोरच्याला हेच वागण चुकीच वाटत असत.
कोणाच मन मोडू नये म्हणून आपण सुरवातीला काही बोलत नाही. आणि नंतर हि सवय होऊन जाते. आणि नकळतच आपण कोणाचातरी मन दुखावून बसतो.
'एका छोट्याश्या काडीने उंटाची पाठ मोडावी' तसं नात मोडत.

एक मनमोकळा संवाद हि परिस्थिती रोखू शकतो, पण हा संवाद सुरु कोणी करायचा? स्वाभिमान नात्यासाठी बाजूला कोणी ठेवायचा? आणि जर ठेवलाच तर समोरचा त्याचा मान ठेवेल का?? अश्या एक ना अनेक प्रश्नांमध्ये आपण वेळ गमावून बसतो.
छोटीशी ठिणगी जर वेळीच नाही विझवली तर पूर्ण जंगल जळून जात, तसं आपण मन जाळून बसतो. मनावर झालेले घाव कोणीच विसरत नाही.
आपण नेहमी सुसंवाद ठेवला पाहिजे असं म्हणतात ते यासाठीच कदाचित.

"संसार हा रबर बेन्ड सारखा असतो, ताणला ना दोन्ही बाजूने तर तुटणारच. एकाने तरी सैल सोडायला हवा." (अगबाई अरेच्चा सिनेमातील)
कोणीतरी स्वाभिमान बाजूला ठेवून सुरुवात करायलाच हवी. अर्थात समोरच्यानेही तितकीच साथ दिली तर प्रश्न लवकर सुटतात.

संसाराप्रमाणेच प्रत्येक नात्यातही असाच काहीस वागाव लागत.

रेशमी धागाच तो. तलम, मऊ, सुंदर, मनाला भिडणारा आणि तितकाच नाजूक. जपायलाच हवा.
एक छानसं गाढ विश्वासच कवच घालून. कर्णाच्या कवच कुंडलासारख. मग कितीही मोठं वादळ येउदे, आतली सुंदरता तशीच राहते.

आपल्याकडच्या प्रत्येक रेशमी धाग्याला असं एक कवच असलं की मग आयुष्य सुंदर होत जात. जगण्यात मजा येते. बघा प्रयत्न करून.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, June 23, 2011

(अ)नियम

"FIrst Break All The Rules"
(कोणी लिहिलंय ते माहित नाही, पण मस्त लिहिलंय)
जगभरात थोरामोठ्यांनी अनेक संदेश दिले आहेत. त्यात सगळ्यात जास्त पाळला जाणारा संदेश हाच असावा.

मेंदूला चालना मिळून आपण काहीतरी नवीन शोधाव म्हणून सांगितलेली शिकवण. काय असेल ते असो पण सगळेच जण मनापासून प्रामाणिकपणे पाळतात ही शिकवण.

दिसला नियम की तोड!!!

परीक्षेत पास झाल्यावर जसा आनंद होतो, तसा काहीस फिलिंग येत नियम तोडल्यावर.

याच सगळ्यात मस्त उदाहरण बघायचं असेल तर कोणत्याही इमारतीच्या जिन्यात जाव. बाकी संपूर्ण इमारतीचा रंग काहीही असो, पण जिन्याच्या कोपर्याचा रंग कायम लालच असतो.
"कृपया थुंकू नये" हे शब्द बिचारे कोपर्यात कुठेतरी अंग चोरून उभे असतात.

"चालत्या बस मध्ये चढू अगर उतरू नये." हा नियम लोक जीवाच्या भीतीने पाळतात पण मग त्यात मजा काय ना? म्हणूनच बसचालक बस नेहमी थांब्याच्या थोड्या पुढे किंवा कधी थोड्या मागेच उभी करतात. (कधी कधी तर हे थोडा अंतर वाढत वाढत बस डायरेक्ट पुढच्याच थांब्यावर.) अश्या वेळेस चालत्या सोडा धावत्या बसमध्ये चढाव लागत. :D

"नो पार्किंग" ही संकल्पना तर गम्मतच आहे. ही पाटी कायम गर्दीत वाट हरवल्यासारखी उभी असते. मग पाटीला वाईट वाटू नये म्हणून मग त्यातला 'नो' खोडून टाकायचा.

डाव्याबाजुने ओव्हरटेक करू नये; हा नियम तर बादच करायला हवा.
त्याऐवजी नवा नियम तयार करायचा, "कृपया जागा मिळाली तरच ओव्हरटेक करा, उगाच मध्ये मध्ये वाहन आणू नका"
(कारण आजकाल बाजू बघायला रस्त्यावर जागा आणि लोकांकडे वेळच नाहीये)

असो अशी यादी करत गेलो तर कदाचित भारताचं नाव (अ)संविधान तयार होईल.

सरळ सांगून कोणी ऐकत नाही, म्हणून नियम केले. तर नियम तोडण्यात सगळे पुढे. म्हणूनच कदाचित पुणेरी लोकांनी नवी शक्कल लढवली. "नो पार्किंग" च्या ऐवजी "इथे गाडी लावणारा मी गाढव आहे" असं लिहायला सुरुवात केली. (हेतू नक्कीच साध्य होत असावा. :D)

नियम आला की लगेच त्याच्या पळवाटा शोधायला सुरुवात होते. पण हे सगळ्यांना ज्याच्या त्याच्या सोयीने करायचं असत.

याच सगळ्यात सार्थ उदाहरण म्हणजे भ्रष्टाचार.
माझा एक मित्र एकदा सांगत होता, "भ्रष्टाचार करू नये. आपणच पुढाकार घेतला नाही तर हे कस बदलणार?" आणि असं बरंच काहीतरी तत्वज्ञान देत होता.
दुसर्या दिवशी त्याच्या पासपोर्ट साठी त्याला पोलीस व्हेरिफिकेशन साठी जायचं होतं. आदल्या दिवशीच मला तत्वज्ञान दिल्याने त्याने पैसे दिले नाही. मग काय हवालदार काकांनी पण कारणं द्यायला सुरुवात केली. आणि मग जास्त त्रास नको म्हणून त्याने गपचूप २०० रुपये दिले आणि काम पूर्ण करून घेतलं.

मी: का रे आता कुठ गेल तुझ तत्वज्ञान?
मित्र: अरे आत्ता जरा अर्जंट मध्ये पास्स्पोर्त हवा आहे. जायचं आहे पुढच्या महिन्यात बाहेर. पुढच्या वेळेस बघ पैसे ना देता काम करून घेईल.

प्रत्येकच थोड्याफार फरकाने असाच असत. स्वतः नियम तोडताना 'इमर्जन्सी आहे रे' आणि इतरांनी केला तर 'यामुळेच भारत पुढे जात नाही.'

मुळात नियम करावेच का लागतात?
"साक्षर लोकांना सुशिक्षित कारण हीच या देशाची खरी गरज आहे" (कायद्याच बोला चित्रपटातील वाक्य)
चांगल कसं वागायचं हे सगळ्यांनाच काळात. मग नियम का लागतात? कारण प्रत्येकजण परिस्थिती आपल्या सोयीने बघतो.

नो पार्किंग चा नो खोडण्यात मेहनत घेण्यापेक्षा गाडी योग्य जागेत लावण्याची मेहनत घ्यावी.
"पण मग त्याने का नाही गाडी जागेवर लावली? आधी त्याला सांगा." ही मानसिकता कायम आड येते.

ही विचारसरणी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सगळे नियम व्यर्थ. आणि बदलल्यानंतर कदाचित नियमांची गरजच उरणार नाही...

Tuesday, June 7, 2011

परीक्षा

ऑफिस मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होती.सगळी तयारी झालीये पण काहीतरी एक राहिलंय असे काहीसे चेहऱ्यावरील भाव. किंचित टेन्शन.
त्यात मी कडक आवाजात सूचना देऊन वातावरण अजून थोडसं गंभीर केल.

Start म्हटल्याबरोबर सगळेजण पेपर सोडवण्यात दंग. त्यांना बघून मला माझे कॉलेजमधले दिवस आठवले. पूर्ण semester अभ्यास केलेला नसायचा. आणि मग परीक्षा आली की सॉलिड वाट लागायची.
त्या एका वर्गात कितीतरी भाव एकत्र आलेले असतात.
ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असतात तो तर राजधानी एक्सप्रेस प्रमाणे सुटलेला असतो. ज्याला काही  येत नसत तो आपला पासेंजर प्रमाणे सगळी कडे थांबत थांबत उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
कोणी नख खातात, कोणी डोक खाजवतात, कोणी सारखे घड्याळाकडे बघत असतात तर कोणी पेपर सेट करणार्याला नाव ठेवत बोट मोडत असतात.
कोणाची पेपरवर  गणित मांडलेली असतात तर कोणाची हवेतच आकडेमोड चालू असते.
सगळी उत्तर येणाऱ्याची चिंता वेगळीच असते. "साला सगळी उत्तर इतकी सहज येतायेत, काही चुकत तर नाहीये ना??" (मला असं बऱ्याचदा होतं. :D)

आपल्याला उत्तर येत नसल की आपण मग आपल्यासारखा अजून कोण आहे का ते शोधत असतो. कोणी तरी सापडतच. मग जरा समाधान मिळत. तितक्यात आवाज येतो,
"सर, सप्लीमेंट."
झाल. आपल उरल सुरलं अवसान पण गळून पडत. मग सगळी हुशार मुल सप्लीमेंट मागायला सुरुवात करतात. (कधी कधी मोकळीच. उगाच भाव खाऊन जायचं म्हणून.)

परीक्षेत आपल्याला मागच्या महिनाभरात घोकालेल सगळच उतरवायचं असत. पेपर च्या अर्धा तास आधी वाचलेलं सगळ्यात आधी बाहेर काढव लागत. कारण ते पुसलं जाण्याची शक्यात फार जास्त. पेपर च्या आधी, "अरे काय टेन्शन घेतो यार? सोप्पा विषय आहे हा एकदम"  म्हणणारे पण घाम पुसताना दिसतात.

जुन्या काळी परीक्षा म्हटली की पाठीत गोळे यायचे. कारण जर मार्क कमी पडले तर शाळेत गुरुजी मारणार आणि घरी आल्यावर गुरुजींनी तुला टोले दिले म्हणजे तुझच चुकल असणार असं म्हणून वडील फैलावर घेणार.

पण आता परीक्षा म्हटली की पोटात गोळे येतात. (मुलांच्या नाही, त्यांच्या पालकांच्या. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो ना)
युद्धावर निघालेल्या राजासारखी पालकांची तयारी चालू असते मुलांच्या परीक्षेसाठी.

बर परीक्षा झाली की आराम नाही. कारण लगेचच निकाल  लागणार असतो. आणि त्यावरच रोजच्या खेळण्याचा वेळ अवलंबून असतो. (inverse proportion मध्ये)

"सर, टेस्ट चा रिझल्ट कधी येणार?" "इन्टरव्हीव्यू लगेच होणार का?" असे एकामागून एक प्रश्न मुलांनी मला विचारायला सुरुवात केली. सगळ्यांना जेवून यायला सांगून मी पेपर चेक केले. आणि इन्टरव्हीव्यू चा शेड्युल तयार केल.
रिझल्ट ची घाई करणारे हेच मुलं इन्टरव्हीव्यू शेड्युल बघून एकदम फुस्स झाले. "सर, मला पहिले नाही जायचं. दुसर कोणीच नाही का? त्याला पाठवा, तो हुशार आहे."
"सर किती जण असतात इन्टरव्हीव्यू घ्यायला? कसे प्रश्न विचारतात?"
मला वाटायला लागल जसा काय माझाच इन्टरव्हीव्यू चालू होता.

तिकडे रूम मध्ये इन्टरव्हीव्यू सुरु, आणि बाहेर सगळ्यांच्या फेऱ्या सुरु. भयंकर बेचैनी. आणि घड्याळाचा काटा एकदा २० मिनिटांच्या वर गेला की सगळ्यांचे चेहरे हवा गेलेल्या चेंडूसारखे होतात.
सिंहाच्या गुहेतून मुलगा बाहेर आला की लगेच सगळे त्याच्यावर परत तुटून पडतात. "काय विचारलं? प्रोजेक्ट चा काय सांगितलं? अवघड प्रश्न विचारतात का?"
इन्टरव्हीव्यू चांगला गेलेला मुलगा एकदम वाघ मारून आल्यासारखा असतो नाहीतर वाघ मागे लागलेल्या शिकाऱ्यासारखे भाव दिसतात.

सगळ झाल की मग पुन्हा, "सर फायनल रिझल्ट कधी?"

परीक्षेच्या आधी आणि रिझल्ट च्या आधी नक्कीच देवाचा inbox कायम फुल राहत असणार. कोणाला रिझल्ट चांगला हवा असतो तर कोणाला तो पुढे ढकलला जावा असं वाटत असत.

शेवटी मुलं ती मुलच, परीक्षा त्या परीक्षाच, इन्टरव्हीव्यू ते इन्टरव्हीव्यूच राहणार. या सगळ्यांचा स्वरूप कायम बदलत राहणार. पण एक नक्की पोटात होणारी गडबड कायम तशीच राहणार. :)

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, September 16, 2010

नाती..

"माझी अवस्था चेस बोर्डवरल्या घोडय़ासारखी झालीय. एक- दोन- अडीच बास..."
असा मित्राचा स्टेटस मेसेज  होता. तो वाचून मी त्याला सहजंच रिप्लाय केला,
"अरे मी तर प्याद्या सारखा झालोय. गरज असेल तेव्हा वजीर जिवंत करायला वापरायचा नाहीतर दुसऱ्या कोणालातरी वाचवायचं म्हणून बिनधास्त बळी देऊन टाकायचा."

खरतर तो रिप्लाय काहीतरी द्यायचा म्हणून दिला होता. पण नेहमीप्रमाणे उगाच त्यावर विचार करत बसलो.

बऱ्याच जणांचा स्टेटस मेसेज असतो, "Always use things and Love people, but in reality generally people do apposite."
कोणी लिहीलं आहे हे माहित नाही, पण आजच्या काळात एकदम समर्पक आहे. आपल्या फायद्यासाठी बरेच लोक गोष्टी आणि माणसे यात गोंधळ करून नको तेच करतात.

गरज असेपर्यंत माणसाची किंमत स्वतःच्या आयुष्याहूनही जास्त असते, आणि गरज संपल्यावर, ओळख दाखवणेही अवघड असते.
यालाच जुन्या लोकांनी 'कलयुग' नाव दिलय बहुतेक.

जगात माणसांवर प्रेम करा, हे जितक्या लोकांनी सांगितलाय तितका दुसरा कोणताही उपदेश  थोर लोकांनी आजपर्यंत केला नसेल. कितीतरी कविता, गाणी आणि लेख लिहिले गेलेत.

खरंच, माणसाला माणसासारख जगा हे सांगण इतक आवश्यक झालंय?

माणूस हा सगळ्या प्राण्यामधला सर्व श्रेष्ठ प्राणी. सगळ्यात प्रगत, सगळ्यात पुढे. आणि हे पद टिकवून ठेवण्यासाठी अनेक बदल माणसाने घडवून आणले. त्यानंतर काय?
म्हणून आता माणसातच पुढे राहण्याची शर्यत लागली.

आणि त्यासाठी मग नवे डावपेच. स्वार्थ, लबाडी, धूर्तपणा, फसवेगिरी हे सगळ नव्या रूपाने समोर येऊ लागलं. कारण आता प्रतिस्पर्धी सुद्धा माणूसच आहे.
आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी, ते तुझं, हे माझं; मी उच्च, तू नीच; मी श्रीमंत, तू गरीब; मी मोठा, तू लहान असे अनेक फरक केले जाऊ लागले.
जसा जसा काळ बदलत चालला आहे, तसे तसे हे फरक करणे जरी कमी होत असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी शीत-युद्ध सुरूच असते.

आज काळ गोड बोलून काम काढून घेण्यात सगळे जन PHd घेऊ पाहतायेत.
'गरज सरो, वैद्य मारो' ही म्हण आपण पूर्णपणे सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण प्रत्येक गोष्टीमागे 'आमचा फायदा काय?' हे शोधतो. का? एखादी गोष्ट आपण माणुसकीच्या नात्याने नाही करू शकत?
पण माणुसकी दाखवायला वेळ आणि पैसा खर्च करणे कोणालाच आज शक्य नाही.

आपले नातेवाईक निवडण आपल्या हाती नसत. पण कोणाशी किती संबंध चांगले ठेवावे हे आपल्या हाती जरूर असत. ज्याच्याकडून जास्त फायदा तो जवळचा, आणि ज्याला दर वेळेस आपल्यालाच पुढे होऊन मदत करावी लागेल तो लांबच असलेला बरा.
उद्या जवळच्या माणसाला मदत करावी लागली तर? तो हि कालांतराने लांब गेलेलाच बरा.

मित्रांच्या बाबतीत तर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असत. कोणाला मित्र करून घ्यायचं आणि कोणाला नावालाच म्हणून मित्र म्हणायचं ते पूर्णपणे आपणच ठरवतो.
मग कायम आपलं ऐकणारा, नेहमी मदत करणारा, आपल्या सगळ्या मागण्या मान्य करणारा आणि भविष्यात आपलं फायदा करून देऊ शकणारा आपला चांगला मित्र.
दुसऱ्या कोणाच्या बाबतीत ५० वेळा विचार करावा लागतो. ना जाणो उद्या आपल्याच अंगावर आला तर काय घ्या? त्यापेक्षा नावापुरताच मित्र ठेवलेला बरा.

कुठेतरी वाचण्यात आलं होत, 'माणसांसाठी रिलेशन असतात, रिलेशन साठी माणसे नाही..'
पण हे समजून घेण तर सोडाच, ते ऐकायलाही वेळ नाहीये कोणाकडे.

माणसांनी सख्या भावंडानाही   नाही सोडलं तर मित्राची काय कथा....

आजही बरीच वयस्कर मंडळी कायम म्हणतात, "आमच्या वेळेला हे असा नव्हत. सगळे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आता पुर्वीसारख राहिलेलं नाही. काळ बदलला."
मला प्रश्न पडतो, काळ बदलला म्हणजे नक्की काय झालं? दिवस उशिरा उगवायला लागला की रात्र लवकर व्हायला लागली की सूर्य पश्चिमेकडून उगवायला लागला?

बदलली ती माणस. बदल झालं तो माणसाच्या स्वभावात. एकत्रितपणे पुढे जाण्याच्या ऐवजी स्वतःचा फायदा प्रथम दिसू लागला.
आणि माणसे दुरावतच गेली.

आपल्याला लहानाचा मोठा करणाऱ्या आई वडिलांना त्यांच्याकडे देण्यासारख काही उरल नसेल तर वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं, नातेवाईकांना  कामाशिवाय कधीही न विचारणारे नातेवाईक, मित्राला दूर सारणारा मित्र आणि अजून अश्या ईतर सगळ्यानी उद्या जर जग त्यांच्याशी असेच वागलं  तर कोणाकडेही तक्रार करू नये, फक्त आपला भूतकाळ आठवून पाहावा.....
सगळी उत्तरे आपोआपच मिळतील.

आणि कदाचित कळेल कि आपली मुले, मित्र, नातेवाईक हे सगळे आपणच दिलेली शिकवण पुढे चालू ठेवतायेत....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Friday, August 27, 2010

अपेक्षा........

"मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा ऐकायला मिळणार हे वाक्य.
कधी वडील मुलाला, कधी भाऊ बहिणीला, कधी आजोबा नातवाला तर कधी मित्र दुसऱ्या मित्राला...
५ शब्द फक्त, पण एकदम जिव्हारी लागणारे.
बऱ्याचदा हे वाक्य एखाद  नात  तोडायलाही पुरेस  असत.

दुखावलेल  मन जोडण  फार अवघड असत. पण या वाक्यामुळे दुखावलेल  मन जोडण मला तरी अशक्य वाटत. आपण  कितीही भरपाई करण्याचा प्रयत्न केला तरी जुन्या अपेक्षाभंगाच दुःख कुठेतरी कोपऱ्यात सलत असत. त्या एका चुकीसाठी आपण माफी नाकारतो. मग  तो आप्तेष्ट असो मित्र असो वा कोणीतरी तिसरी व्यक्ती असो.

जवळच्या माणसाकडून हे ऐकण्याची वेळ कोणावरही का यावी?
कारण  सोप्पं आहे. महत्वाच्या काळात चूक  झाली तर हे ऐकायला मिळणारच.

पण समोरच्याने जे काही केल ते चूकच आहे हे आपण कसं ठरवणार? तुमच्या मनासारख  जर एखादी व्यक्ती नाही वागली तर ती चुकीची वागते आहे (इति वपू) हे साधं सरळ गणित आपण मांडतो.
पण समोरच्याने कसं वागावं हे ठरवणारे आपण कोण? आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र किंवा अजून कोणीतरी जवळचे म्हणून आम्ही सांगतो तसं त्याने वागावं. का? त्याला स्वतःच असा काही विचार नाहीये का? स्वतःच असं काही आयुष्य नाहीये का? स्वतःच असं स्वातंत्र्य नाहीये का? आपल्या मनाप्रमाणे आपला मित्र वागत नाही म्हटल्यावर त्याला दोष देण्यापेक्षा तो तसा का वागला याचा शोध किती जण  घेतात? त्या क्षणाची त्याची मनःस्थिती किती जण समजून घेतात? त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी किती वेळा मिळते?
फारंच  कमी वेळा, आणि मग अपेक्षा भंग समोर येतो.
आणि बऱ्याच वर्षात  रोपट्यापासून वटवृक्षात  रुपांतर झालेलं नात्याचं झाडं क्षणात  उन्मळून  पडत.

मुळात आपण कोणाकडूनही अपेक्षा का करतो? नुकतीच ओळख झालेल्या मित्राला आपण हे कधीच ऐकवत नाही. कारण त्याच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नसतात.

मैत्री हळू हळू वाढत जाते. जवळीक निर्माण होते. काही महत्वाच्या क्षणाला मैत्रीचा हात  सोबत मिळतो आणि मैत्री गाढ होत जाते.

नंतर विनंती ऐवजी हक्काने एखाद काम सांगितलं जात. आणि मित्रासाठी म्हणून ते केलाही जात. क्वचितच कधीतरी नकार येतो. आणि मग आपल्या मागण्या वाढत जातात.

कुठेतरी वाचण्यात आलेलं एक फार छान उदाहरण  आहे.
एखाद्या चिक्कार गर्दीच्या दिवशी बस च्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला वाटत कि बस मध्ये कमीत कमी लटकून का होईना पण उभं राहण्याची जागा मिळावी. ती मिळाली तरी फार झाल. तशी जागा मिळाल्यावर थोड्याच वेळात माणसाचा कमीत कमी टेकू घेऊन उभं राहण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु होतो. पुढची पायरी कुठेतरी जरा पुढेमागे करून बसायला मिळावं यासाठी जागेचा शोध सुरु होतो. नंतर व्यवस्थित बसायला मिळावं असं वाटायला लागत.
आणि ते मिळाल कि मग पूर्ण जागा रिकामी मिळावी जेणेकरून  नीट हात पाय  पसरून बसता येईल असं वाटायला लागत.
अश्या वेळेस जर कोणी विचारलं कि हि जागा मोकळी आहे का तर उगाच त्या माणसाचा राग येतो. दुसरीकडे पण जागा रिकामी आहे तिकडे जाऊन हा माणूस का बसत नाही असं वाटायला लागत.
आपण उभे असताना आपल्याला कोणीतरी टेकायला जागा दिली होती या गोष्टीचा साफ विसर पडतो. आणि आपण आपल्या आरामाचा विचार करतो.

कादाचित अपेक्षांच्या बाबतीतही असाच काहीस होत असावं. हळू हळू आपण त्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जातो कि आपण त्याच  स्वतःच अस्तित्वच नाकारतो आणि त्या व्यक्तीचा पूर्ण वेळ आणि श्रम आपल्यासाठीच असावं असाही वाटायला लागत.

दुसरीकडे मोकळी जागा असूनही आपल्या शेजारी येऊन बसणाऱ्या माणसाचा आपल्याला जसा राग येतो तसाच काहीस मग आपल्यासाठी पूर्ण वेळ न देणाऱ्या मित्राबाबत वाटायला लागत.

आप्ल्याइतकच महत्वं असणारी दुसरी व्यक्ती असू शकते हे आपल्या मनाला पटतच नाही. आणि मग चुकांचा शोध सुरु होतो. ज्या चुका आधी दुर्लक्षित केलेल्या होत्या त्याच आता मोठ्या वाटायला लागतात. आणि सरतेशेवटी या सगळ्याचं रुपांतर "मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्ह्ती" यात होत.

बऱ्याचदा यात समोरच्याला तर कल्पनाही नसते कि नक्की इतक मोठ काय  झालं?
आणि मला महत्वं कमी दिल जातंय हे सांगायला आपण तयार नसतो. आपल्याला वाटत असत हे इतकं साधं त्याला कळायला नको? हे सांगायची गरजच का पडावी? इतक्या वर्षांच्या मैत्रीत याला इतकही कळू नये?

पण आपण समोरच्याच अस्तित्वच नाकारू पाहतोय हे आपल्याला कळत नसत.

हे जग आशेवर (किंवा अपेक्षांवर) चालते. पण खर बघितलं तर हे जग स्वार्थावर चालते. दुसऱ्याकडून अपेक्षा, दुसऱ्यावर आपण सांगत असलेला हक्क, दुसर्यानेच आपल्याला समजून घ्या हि  (छोटीशी?) मागणी या सगळ्यात स्वार्थच लपलेला असतो.

कधीतरी याच्या उलट विचार करून पाहावा.
दुसऱ्याकडून अपेक्षाच ठेवू नयेत. सगळ्यांच्या जवळ जावे पण अपेक्षा न ठेवता. स्वतःच्या अपेक्षा पुर्तीची वाट बघत बसण्यापेक्षा दुसर्यांचा थोडासा विचार करा.

आयुष्यातली ८०% दुःख अपेक्षा केल्यामुळे तयार होतात. आपण त्या त्रासाच मुळच नाहीसं केल तर?
पण आपल मन त्यातही समाधानी नसत. कोणावर तरी परोपकार केल्याची भावना मनात येते आणि पुन्हा त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि हे चक्र असंच सुरु राहत, अखेरपर्यंत.

याला पर्याय मी तरी सांगू शकत नाही. कारण माणसाचा तो स्वभाव दोषच आहे. तो कसा दूर करायचा हा ज्याचा त्याने ठरवावा. दुसर्याने कसं वागून हा देश दूर करावा हे सांगून परत त्याने तसं वागाव हि अपेक्षा तयार होते. आणि तसं नाही झालं तर पुन्हा मनाची तगमग. पुन्हा अपेक्षाभंग.

मला स्वतःला हि अजून यातून बाहेर पडायचा मार्ग सापडला नाहीये. तोपर्यंत हा सगळा खटाटोप कोपऱ्यात सलत असलेल्या अश्याच  कोणत्यातरी अपेक्षाभंगाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी...

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...